संच १
- आईबाबांची सोडून माया , ताई दादाचा सोडून लळा --------------
रावांबरोबर लग्न केले आहे आज, मला सुन नाही तर लेक म्हणून स्वीकारा
- हंड्यांवर हंडे सात आता कोणी नाही ठेवत
हंड्यांवर हंडे सात आता कोणी नाही ठेवत
-----------रावांचे नाव घेते आता अजुन उभा नाही राहवत
- साधा भोळा चेहरा परदर्शक स्वभाव
------------राव भेटले आता जीवनात आहे कसला अभाव
- उभी आहे मी मंडपात नाव घेण्यासाठी
उभी आहे मी मंडपात नाव घेण्यासाठी
------------रावांचे नाव घेते आता , दया परवानगी घरात येण्यासाठी
- मन आले भरून जेव्हा ----------------- राव म्हणाले
चूल अणि मूल झाली म्हण आता जुनी
स्वतंत्र आहे प्रत्येक स्री , म्हणून संसार करू दोघे मिळुनि- हरतालिकेचा उपवास मी लहान पणापासून ठेवला
हरतालिकेचा उपवास मी लहान पणापासून ठेवला
म्हणूनच ------------------- रावांच्या रुपात मला भोळा शंकर लाभला
म्हणूनच ------------------- रावांच्या रुपात मला भोळा शंकर लाभला
- मेघाचा वर्षाव आज लग्न मंडपावर झाला ,
मेघाचा वर्षाव आज लग्न मंडपावर झाला ,
सर्व देवांचा आशीर्वाद मला --------------- रावांच्या रुपाने लाभला
- अक्षता पडल्या मंगलाष्ठके झाली , आता सप्तपदी ही झाली
----------------------------- राव झाले आज माझे हक्काचे पति
- संध्याकाळची वेळ आली मंडपात वरात
संध्याकाळची वेळ आली मंडपात वरात ------------- रावांचे नाव घेते
आता घ्या गृह लक्षमीला घरात
- चौरंघ मांडला , त्यावर सत्यनारायणसाठी तांदळाचे केले आसन
चौरंघ मांडला , त्यावर सत्यनारायणसाठी तांदळाचे केले आसन
------------------ रावांबरोबर सुखी संसारचे मी देते आशवासन
- साडीची जागा आता घागरा चोलीने घेतली
साडीची जागा आता घागरा चोलीने घेतली
--------------- राव म्हणाले कितीही कर तू फैशन ,साडीतच तू मला आवडली
- मेहेंदिने हात रंगला हल्दीने रंग उजळला
मेहेंदिने हात रंगला हल्दीने रंग उजळला
--------------- रावांच्या साथीने माझा संसार सजला
No comments:
Post a Comment