Monday 26 April 2021

                                                            आनंद आणि प्रेम


आयुष्यात कमीतकमी एक खरा माणूस असणे ही आपल्या सर्वांसाठी नेहमीच कौतुकास्पद गोष्ट असली पाहिजे. अशा सर्व लोकांचे आभार माना ज्यांचे आपल्या हृदयात विशेष स्थान आहे आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल आपल्या जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगा.जेव्हा आपल्याला खांदा टेकवण्याची गरज असते ,जेव्हा घळघळून रडावसं वाटतं तेव्हा खरंच कोणीतरी आपल्याला समजणार हवा असत. 

आपले  आयुष्य खूपच अनिश्चित आहे हे लक्षात घेऊन विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. आपणास जर असे वाटल असेल की संकोच न करता मोकळेपणाने बोला,  दुसर्यांना सांगण्याआधी त्या माणसाला सांगा कदाचित त्यात गैरसमज हि असू शकतो ,जर त्यांना वाटत असेल की आपण त्यांच्या जवळचे आहात तर त्यांना तुमच्या स्पष्ट बोलण्याचे कधीही वाईट वाटणार नाही.

  माणूस जीवनात आहे तोपर्यंत्त हे सर्व वाटत असता हो पण आता तर चालती बोलती माणसं अचानक साथ सोडून जात आहेत मग कसले राग रुसवे आणि कसल्या त्या स्पर्धा. आपल्या आवडत्या गोष्टीत रमवून घ्याआणि चिंता मुक्त व्हा .जमल्यास किमान ५ माणसांना तरी आनंद द्य। बघा किती समाधान वाटेल ते .

 म्हणून आतापर्यंत शक्य तितक् एकमेकांना मदत करण्याची वेळ आली आहे. मदत करणे कुठल्याही स्वरूपात असू शकता जसा एखाद्याला हसवणे , सकारात्मक संदेश पाठवणे, मजेदार विनोद पाठविणे आणि इतरांनी केलेल्या प्रत्येक लहान गोष्टीबद्दल प्रशंसा करणे या दृष्टीने असू शकते.

तुमचे किती मित्र आहेत त्या पेक्षा किती चांगले मित्र आहेत हे महत्वाचा आहे आज कित्येक जण स्वतःच्या कसल्या तरी कामासाठी हि सतत संपर्कात राहतात आणि ते करण चुकीचं  नाही आहे कारण खरा व्यावसायिक तेच करेल पण काही लोक खरंच मायेने सुद्धा कॉल करत असतात आणि त्यांच्या कडे वेळही असत।  सतत कॉल केला म्हणजे तो व्यक्ती आपल्यावर  जीवापाड  माया दाखवत आहे आणि जो नाही करत त्याला तुमची कदर नाही असा नसता, जरा आठवा  जेव्हा मोबाईल कॉल ला पैसे लागायचे तेव्हा इतक्या वेळ कोणी बोलायचं का ?आणि बरेच दिवसांनी कॉल केल्या नंतर चा आनंद कधी कमी असायचा का ? उलट तो जास्त हवा हवा सा असायचा त्यात वेगळी ओढ असायची.

कधीही तुम्हाला असा वाटलंच तर  त्याच्या जागी राहून बघा आणि मग तसा विचार करा  कि तो मला का कॉल करत नसेल .आज वर्क फ्रॉम होम मुळे कित्येक लोक रात्रं दिवस काम करत आहेत आणि अक्षरशः डिप्रेशन मध्येहि जात आहेत , त्यांना हि गरज आहे तुमच्या सोबतीची. स्त्रियांना तर त्या सोबत मुलं आणि घर सांभाळावा लागत आहेत त्यांची परिस्तिथी सर्वात बिकट आहे असे सर्वे मध्ये   दिसून आला आहे अशा वेळी तुम्ही स्वतः मन मोठ करून कॉल करून एकदा विचारपूस करा त्यांची बघा किती शंका दूर होतील आणि तुमचा नातं अजून फुलून येईल आणि खरंच ती व्यक्ती तुमच्या रागास पात्र आहे कि नाही हे सुद्धा समजेल.

चला वेळ आहे तोपर्यंत सर्वांना आनंद आणि प्रेम देऊ या एकमेकांना समजून घेऊ या.


अर्चना पाटील किणी

Sunday 23 February 2020

Marathi Ukhane Fun Time - मराठी उखाणे _Wedding and Pooja

संच १ 


  • आईबाबांची  सोडून माया , ताई दादाचा सोडून लळा --------------

रावांबरोबर लग्न केले आहे आज, मला  सुन नाही तर लेक म्हणून स्वीकारा


  • हंड्यांवर हंडे सात आता कोणी नाही ठेवत 

हंड्यांवर हंडे सात आता कोणी नाही ठेवत

-----------रावांचे नाव घेते आता अजुन उभा नाही राहवत


  • साधा भोळा चेहरा परदर्शक स्वभाव

------------राव भेटले आता जीवनात आहे कसला अभाव


  • उभी आहे मी मंडपात नाव घेण्यासाठी 

उभी आहे मी मंडपात नाव घेण्यासाठी
------------रावांचे नाव घेते आता , दया परवानगी घरात येण्यासाठी


  • मन आले भरून जेव्हा ----------------- राव म्हणाले

चूल अणि मूल  झाली म्हण आता जुनी 
स्वतंत्र आहे प्रत्येक स्री , म्हणून संसार करू दोघे मिळुनि


  •  हरतालिकेचा उपवास मी लहान पणापासून  ठेवला 
हरतालिकेचा उपवास मी लहान पणापासून  ठेवला  
म्हणूनच ------------------- रावांच्या रुपात मला भोळा शंकर लाभला 

  • मेघाचा वर्षाव  आज  लग्न मंडपावर  झाला , 
मेघाचा वर्षाव  आज  लग्न मंडपावर  झाला , 
सर्व देवांचा आशीर्वाद  मला --------------- रावांच्या रुपाने लाभला 


  • अक्षता पडल्या मंगलाष्ठके झाली , आता सप्तपदी ही झाली 
----------------------------- राव झाले आज माझे हक्काचे पति 


  •  संध्याकाळची वेळ आली मंडपात वरात

 संध्याकाळची वेळ आली मंडपात वरात  ------------- रावांचे नाव घेते
आता घ्या गृह लक्षमीला घरात 



  • चौरंघ मांडला  , त्यावर  सत्यनारायणसाठी  तांदळाचे केले आसन

चौरंघ मांडला  , त्यावर  सत्यनारायणसाठी  तांदळाचे केले आसन
------------------ रावांबरोबर सुखी संसारचे मी देते आशवासन 


  •  साडीची जागा आता  घागरा चोलीने घेतली 
साडीची जागा आता  घागरा चोलीने घेतली 
 --------------- राव  म्हणाले कितीही कर तू फैशन ,साडीतच तू मला आवडली


  • मेहेंदिने हात रंगला  हल्दीने  रंग उजळला 
मेहेंदिने हात रंगला  हल्दीने  रंग उजळला 
--------------- रावांच्या  साथीने  माझा संसार सजला